Posts
काही नाती दीर्घकाळ का टिकत नाहीत?
- Get link
- X
- Other Apps
आजकाल नाती टिकत नाहीत हे कटू पण सत्य आहे. माझ्या माहिती प्रमाणे खालील काही कारणे आहेत: १. नाती न टाकण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोन . पहिले आपल्याला काही माहिती हवी असेल किंवा कुठल्या गोष्टी मध्ये अनुभव माहित करून घ्यायचा असेल तर आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना विचारायचो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद व्हायचा. पण आता सुनेला नवीन रेसिपी करायची आहे तर ती सासूला न विचारात आधी मोबाईलमध्ये youtube वर शोधते, मग तिला सर्व रेसिपीस चे नोटिफिकेशन्स आपोआप येत जातात मग कुणाला काही विचारण्याचा प्रश्न च येत नाही. मग सासूबाईंना वाटते हि आधी मला विचारून करायची आता सगळं मोबाइललाच विचारते. तसेच लग्न झाल्यावर मुली नवीन शहरात किंवा नवीन जागेत जातात. तेव्हा तिथे काय चांगले मिळते कसे जायचे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे google मुळे भेटून जातात. जो तो आपापल्या मोबाइलला चिकटलेला. सर्वाना पडलेले प्रश्न google देतोय. त्यामुळे कोणाला ना काही विचारण्याची गरज ना प्रत्यक्ष संवाद साधण्याची. जो काही संवाद करायचा तो सगळा सोशल मीडिया वर. घरातल्यांशी काही देणे घेणे नाही आपल्याला अशी वृत्ती बनत चालली ...